Sunday, September 13, 2026
HomeAheriमतदारांचा एखादा चुकीचा निर्णय संपुर्ण क्षेत्राला अधोगतीला नेतो - राजे अम्ब्रीशराव महाराज...

मतदारांचा एखादा चुकीचा निर्णय संपुर्ण क्षेत्राला अधोगतीला नेतो – राजे अम्ब्रीशराव महाराज…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

विरोधकांना घरात होते म्हणणारे मंत्री स्वतःच ४ वर्षे गायब होते.

Gadchiroli/अहेरी ,०८ आक्तटोंबर २०२४::- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ऊमानुर येथे पंचायत समिती गण निहाय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.ऊमानूर पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक खेडे व टोल्यातून ऊदंड प्रतिसाद मिळाल्याने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व नागरीक हजर झाले होते. आदिवासींच्या पारंपारीक ढोल नगार्‍याने राजे साहेबांचे ऊत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी मंचावर कुमार अवधेशराव बाबा,प्रकाश गुडेल्लीवार, शंकरअम्मा गोमासे, बेडके राजना,संतोष पडालवार, शेखर एटली, नारायण गावडे,शंकर नरहरी,विग्नेश यादावार,बंडावर सावकार,विनोद कोरेत,शंकर सिडाम,जेगा कुळमेथे,शंकर गावडे,लालू गेडाम,ईपा मडावी,पोचम बोगर,श्रीनिवास गावडे,बापू तोडसाम,शेखर कुमरे,गंगाराम दुर्गम, सौ.शकुंतलाताई दुर्गम, सौ,विजयाताई विठ्ठलानी,सौ.शालिनीताई पोहनेकर, सौ.वैशालीताई सौरंगपते आदी उपस्तीत होते.कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना मतदारांनी जाणिवपुर्वक व जबाबदारीने मतदान करावे असे आवाहन केले.मतदान करतांना अयोग्य ठिकाणी दिलेले मत हेच आपल्या क्षेत्राच्या अधोगतीला कारणीभुत ठरू शकते याचे मुर्तीमंत ऊदाहरण अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला बघायला मिळत आहे असे प्रतिपादन केले. एका चुकीमुळे संपुर्ण क्षेत्र ३०-४० वर्षे मागे गेल्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मागील ५ वर्षात रस्ते,विज, पाणी आणि आरोग्य या मुलभूत गरजाबाबतीत सोयी सुविधा न वाढता ऊलट परिस्थिती अधीकच बिकट झाली. सर्वच आघाड्यावर फेल ठरल्यामुळे आता गैरप्रकाराने निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न करतील तेव्हा नागरीकांनी सावधगीरी बाळगावी असे आवाहन राजे साहेबांनी केले.परिसरात कोणतेही विकासकाम करु न शकल्यामुळे आतापासुनच साड्या,छत्र्या व घड्याळी सारख्या विविध वस्तू वाटून ऊघडपणे लालूच देण्याचा प्रकार सुरु केले आहे. केलेली विकासकामे न सांगता वैयक्तीक पातळीच्या टिका करणे सुरु केले आहे.विरोधकांवर घरात बसुन होते असे खोटे आरोप करणारे मंत्री स्वतःच साडे चार वर्षे गायब होते.कोरोनामुळे जनता मरत होती, सुरजागडच्या वाहनाच्या अपघातांमुळे जनता मरत होती तेव्हा मंत्री कुठेच भटकतांना दिसले नव्हते. कोणत्याही भागात संपर्क ठेवलेला नव्हता म्हणुनच आता हेलीकाॅप्टरने गाव-गाव फिरावे लागत असल्याची टिका त्यांनी केली. भाजपा महीला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा विजयाताई विठ्ठलाणी व सिरोंचा तालुक्याचे जेष्ठ कार्यकर्ते संतोषजी पडालवार यांनी सुध्दा परखड शब्दात मंत्री साहेबांच्या कामगीरीवर टिका केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजप महीला मोर्च्याच्या जिल्हा महामंत्री सौ.शालिनी पोहणेकर यांनी केले.प्रास्ताविकपर भाषण भाजपा तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन शकुंतलाताई दुर्गम यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular