VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
वन व सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; सभासद व नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन,
गडचिरोली /अहेरी, (नागेपल्ली ) : –वनकर्मचारी पतसंस्था मर्यादित, आलापल्लीच्या नूतन प्रशासकीय भवनाचे लोकार्पण शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागेपल्ली येथील अशोकानगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या नूतन भवनाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला वन व सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‘विना सहकार, नाही उद्धार’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या वनकर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, आलापल्लीच्या प्रशासकीय कार्यालयाचे इमारतीचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडणार आहे. संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सभासदांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक एम. श्रीमती एल्लेवार राजन तल्लमले, उपवनसंरक्षक एम. शैलेश मीना तसेच सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. एस. नकारेरेड्डी यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय उपविभागीय वनाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहकारी संस्था विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सभासदांच्या सेवेसाठी सुसज्ज कार्यालय :-
नूतन प्रशासकीय भवनामुळे वनकर्मचारी व सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थेला अधिक सक्षमपणे काम करता येणार आहे. संस्थेच्या नव्या कार्यालयात सभासदांच्या सोयीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सहकाराच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक विकास साधण्यासोबतच संस्थेची सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हे नवीन प्रशासकीय भवन महत्त्वाचे ठरणार आहे.
सभासद, वनकर्मचारी, नागरिक तसेच सहकार क्षेत्रातील हितचिंतकांनी लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
