
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांचे नेतृत्वात शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर सन्माननिय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम व मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब यांचेशी प्रत्यक्ष भेट व चर्चा.
Gadchiroli / चामोर्शी,०८ ऑक्टोंबर २०२४::- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम व मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब* यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांबाबत अवगत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने… ▪️1) केंद्र प्रमुख पदांवर पदोन्नतीसाठी तात्पुरती सेवा जेष्ठता यादी ही दुरुस्ती करून प्राथमिक शिक्षक पदावरील नियुक्ती दिनांकानुसार तयार करण्यात यावी. ▪️2) गडचिरोली जिल्ह्यातील विस्तार अधिकारी(शिक्षण), केंद्रप्रमुख,उच्च श्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक व विषय शिक्षक (भाषा,गणित/विज्ञान व सामाजिक शास्त्र)यांची रिक्त असलेली पदे सेवाज्येष्ठतेनुसार त्वरित भरण्यात यावी. ▪️3)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ त्वरित देण्यात यावी. ▪️4)उर्वरित वरिष्ठश्रेणी,निवडश्रेणी चे प्रस्ताव मागवुन ते त्वरित मंजूर करणे. ▪️5) 4 टक्के सादील अनुदान जि.प.शाळांना त्वरित अदा करणे. ▪️6)प्रशासकीय बदली प्रवास भत्ता देयके त्वरित अदा करणे. ▪️7) शनिवारी सकाळी शाळा पुर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते ११.०० या वेळेतच भरविण्यात यावी. ▪️8) दुपार पाळीतील शाळा पुर्वीप्रमाणेच सकाळी १०.३० ते ५.०० या वेळेतच भरविण्यात यावी. ▪️9) नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगातील मुळ वेतनानुसार १५ टक्के किंवा सरसकट १५००/- रूपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा. ▪️10) B.L.O.सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढण्यात यावे. ▪️11)माहे सप्टेंबर २०२४ चे वेतन त्वरित करण्यात यावे. ▪️12) बांगला भाषिक शाळेतील सहायक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे.


वरील मुद्द्यांचे अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेसोबत चर्चेदरम्यान मा.मुख्य कार्यपालन अधिकारी मॅडमनी व मा.शिक्षणाधिकारी साहेब यांनी सर्व समस्या लवकरच निकाली काढण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. ▪️ यामध्ये प्रामुख्याने सप्टेंबर २०२४ चे नियमित वेतन ८ किंवा ९ आक्टोंबर ला करण्यात येतील. ▪️ विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,विषय शिक्षकांची रिक्त पदे निवडणूक आचारसंहितेनंतर भरण्यात येतील.


▪️ आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ लवकरच देण्याची कार्यवाही करण्यात येईल. याप्रसंगी प्रशासनाचे वतीने मा.उपशिक्षणाधिकारी श्री विवेक नाकाडे साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री वैभव बारेकर साहेब,मा.सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री धनंजय दुमपेटीवार साहेब व शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिलमवार,गडचिरोली तालुकाध्यक्ष धनेश कुकडे,चामोर्शी तालुका सरचिटणीस मारोती वनकर, जिल्हा शिक्षक संघाचे सल्लागार दामोधर बामनवाडे,दिलीप कुनघाडकर,अनिल मारतीवार, उंदिरवाडेसर,झोडगे सर,पोवरे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
