Monday, September 14, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांचा हस्ते बहीण लाडाची,वाहिनी काळाची...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांचा हस्ते बहीण लाडाची,वाहिनी काळाची या दंडार कार्यक्रमाचा उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

Gadchiroli/अहेरी,०९ ऑक्टोंबर २०२४::- तालुक्यातील धरमपूर येथील सार्वजनिक शारदा मंडळाकडून आयोजित दंडार कार्यक्रम संपन्न…!*अहेरी : विधानसभा क्षेत्रातील या धरमपूर वार्ड मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.अहेरी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या धरमपूर वार्डात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शारदा मातेच्या प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव दरम्यान प्रत्येक मंडळा ठिकाणी दांडिया,संगीतसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते.म्हणून अहेरी तालुक्यातील धरमपूर वार्ड नंबर 4-5 येथील सार्वजनिक शारदा मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांची भेट घेऊन आपला मंडळ ठिकाणी दंडार कार्यक्रम ठेवण्यात यावी म्हणून विनंती केले आहे.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मंडळाच्या विनंतीला मान ठेवून धरमपूर येथील सार्वजनिक शारदा मंडळ ठिकाणी दंडार हा कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर मंडळ ठिकाणी दंडार कार्यक्रमाचा उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार तसेच आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मडावी यांच्या हस्ते काल उदघाटन करण्यात आली आहे.दरम्यान कंकडालवार व मडावी यांनी शारदा मातेची विधिवत पूजा अर्चना,आरती देऊन मातेची दर्शन घेतले.त्यावेळी अजय कंकडालवार यांनी शारदा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख:शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,कार्तिक तोगम माजी ग्रामपंचायत उपसरपंच मरपल्ली,अज्जू पठाण माजी सरपंच,स्वप्नील मडावी,चंदू बेझालवार,रिंकू आत्राम,विनोद रामटेके,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular