Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत भाजपाचा विजय जल्लोष: डॉ. मिलिंद नरोटे यांचा ऐतिहासिक विजय...

गडचिरोलीत भाजपाचा विजय जल्लोष: डॉ. मिलिंद नरोटे यांचा ऐतिहासिक विजय…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२३ नोव्हेंबर २०२४::- गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवून भाजपाच्या यशाचा झेंडा फडकवला. या ऐतिहासिक विजयाने गडचिरोली शहरात विजयी जल्लोष रॅली काढण्यात आली. या रॅलीत मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात जल्लोषात रॅली निघाली.*विजयाचा जल्लोष*डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाच्या निमित्ताने गडचिरोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप आणि विजयी रॅलीने जल्लोष साजरा करण्यात आला.

आयटीआय चौक, बाजार चौक, हनुमान वॉर्ड, सराफा लाईन, गुजरी चौक आणि गांधी चौक,मा.खा.नेते यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालय यांसारख्या भागांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवत कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.*प्रमुख नेत्यांची उपस्थिती*या विजयी रॅलीत नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्यासोबत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,

समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर यांच्यासह मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे,सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे,जेष्ठ नेते सुधाकरजी येंनगदलवार, गजानन जी येंगदलवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण,संजय बारापात्रे, शहराध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, वर्षा शेडमाके,पल्लवी बारापात्रे आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.

बंगाली समाजाचे योगदान यावेळी चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये मा.खा. अशोकजी नेते यांनी सभा घेऊन प्रचार केला, ज्यामुळे बंगाली समाजाने मोठे सहकार्य केले. या सहकार्यामुळे भाजपाचा विजय अधिक सुकर झाला.असे मत मा.खा. नेते यांनी व्यक्त केले.नेतृत्वाचे कौतुकमा.

खा. अशोक नेते यांनी डॉ. मिलिंद नरोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या गडचिरोलीतील विजयाने भाजपाच्या संघटन कौशल्याला आणि नेत्यांच्या परिश्रमांना नवा आत्मविश्वास दिला आहे.गडचिरोलीतील हा विजय केवळ भाजपाचाच नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विजय आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular