VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नंदलाल राठी परिवाराकडून स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन.
चंद्रपूर/मुल, ०२ डिसेंबर २०२४::- तालुक्यातील प्रसिद्ध असलेले हनुमान मंदिर देवस्थान कन्हाळगांव येथे नंदलाल राठी परिवाराकडून अनेक वर्षापासून स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. या स्नेहभोज कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी प्रामुख्याने उपस्थित होते.**यावेळी पिपरे महाराज, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, ज्ञानेश्वर कुणघाडकर, प्रतीक राठी, भोजराज भगत, लोमेश सातपुते, रामचंद्र वरवाडे, सुरज डांगे, दिलीप नैताम, सुनील सोरते कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
