Saturday, May 23, 2026
HomeMulमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांचे प्रथम आगमन प्रीत्यर्थ...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांचे प्रथम आगमन प्रीत्यर्थ मूल येथे शेकडो शिक्षकाच्या उपस्थितीत स्वागत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

  गडचिरोली, १४ डिसेंबर २०२५::- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सन्माननीय राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव साहेब यांचे प्रथम आगमना प्रित्यर्थ मुल (जिल्हा चंद्रपूर) येथे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शिक्षक ब़धू-भगिनींच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले.

 या स्नेहमिलन सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकुशल व तडफदार राज्याध्यक्ष मा.श्री केशवराव जाधव साहेब लाभले होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.               तत्पूर्वी गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर व चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सुभाष बेरड सर यांनी आपापल्या जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मा.राज्याध्यक्षांसमोर आपल्या भाषणातून सविस्तरपणे मांडल्या.

 याप्रसंगी या स्नेहमिलन सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कणखर नैत्तृव असलेले सन्माननीय राज्याध्यक्ष मा.श्री केशवराव जाधव साहेब यांचे गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने पुष्पगुच्छ शाल,श्रीफळ व भेट वस्तू देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. 

 या स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा शिक्षक संघाचे जेष्ठ नेते मा.श्री जी.जी.श्री धोटे सर होते.विशेष अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर व चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सुभाष बेरड सर लाभले होते. 

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हासरचिटणीस अशोकराव राॅयसिडाम सर,जिल्हा सल्लागार श्री राजेश कोतावार सर,श्री दामोधर बामणवाडे सर,जिल्हा कोषाध्यक्ष श्री राजेश चिलमवार सर, चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हासरचिटणीस श्री किशोर उरकुंडवार सर,माजी जिल्हाध्यक्ष श्री संतोष कुंटावार सर,माजी जिल्हाध्यक्ष श्री धनंजय बनसोड सर, सावली शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश जिल्हेवार सर आदी मान्यवर उपस्थित होते. 

 विशेष म्हणजे या स्नेहमिलन सोहळ्यासाठी व मा.राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव साहेब यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सन्माननीय जिल्हा पदाधिकारी, सन्माननीय तालुकाध्यक्ष/तालुका सरचिटणीस यांचेसह सन्माननीय शेकडो शिक्षक बंधु- भगिनींची उपस्थिती लाभली होती.

  आजच्या या स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री नवनित कंदालवार सर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष श्री भास्कर चौधरी सर यांनी मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular