VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १३ डिसेंबर २०२४::- गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदासजी मसराम यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.तसेच मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान व रुग्णालयात फळवाटप करण्यात आले.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास सत्कार्मुर्ती आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार रामदास जी मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, रोहिदासजी राऊत, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, ऍड. राम मेश्राम, परसराम टिकले, तालुकाध्यक्ष जीवन नाट, मिलिंद खोब्रागडे, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, वसंत राऊत, प्रशांत कोराम, प्रमोद भगत, हनुमंतू मडावी, खेमराज तिडके, समशेरखान पठाण, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटके, पांडुरंग घोटेकर, वामन सावसाकडे, काशीनाथ भडके, अनिल कोठारे, प्रतिक बारसिंगे, नितेश राठोड, दिलीप घोडाम, डॉ. आशिष कोरेटी, राकेश रत्नावार सह इतर मान्यवर व पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
