Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliराष्ट्रीय मानवाधिकार संघटनाच्या पत्राची महामाहीम राज्यपाल यांचे कडून दखल...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाच्या पत्राची महामाहीम राज्यपाल यांचे कडून दखल…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ज्वलंत समस्या सोडवण्याबाबत मंत्रालय उपसचिव व मुख्य सचिव यांना निर्देश.

गडचिरोली, १३ डिसेंबर २०२४::- राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी यांनी गडचिरोली जिल्ह्यात आक्टोबर महिन्यात महामहीम राज्यपाल सी, पी, राधाकृष्णन महोदय यांच्या दौऱ्यादरम्यान भामरागड तालुक्यातील प्रलंबित ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्याबाबत निवेदन दिले होते व भामरागड तालुक्यातील जनतेच्या वतीने ही विनंती केली होती भामरागड तालुका हा अति दुर्गम अति संवेदनशील नक्षलग्रस्त तालुका आहे या तालुक्याला सन 2011 मध्ये तत्कालीन महामहीम राज्यपाल पी,सी अलेक्झांडर महोदय यांनी संपूर्ण तालुक्याचे सर्वांगीण विकास करण्यासाठी दत्तक घेतलेला होता परंतु हा तालुका आजही मागास राहिलेला आहे येथे ढगफुटी अतिवृष्टी, अपुरी सिंचनाची सोय, नेटवर्क नसल्याने बकाल बँकिंग व्यवस्था,अपूर्ण रस्ते,नाली पुलिया व तसेच येथील अति आवश्यक आरोग्य व्यवस्था अनेक विकास कामांचे अपूर्ण अवस्था या कारणामुळे तसेच अनेक विकासाचे काम अजून पर्यंत झालेले नाहीत पावसाळ्यात दरवर्षी या तालुक्याचा जिल्हा सोबत संपर्क तुटतो येथील अनेक गावात ना रस्ता , ना पुलिया ,वाहतूक ना नेटवर्क अशा परिस्थितीत भामरागड तालुक्यातील ज्वलंत समस्या मन हे लावून टाकणारे आहेत व गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका वासिय नागरिक यांचे समस्या प्रथम प्राधान्य देऊन सोडवण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली होती.तसेच भामरागड तालुक्यातील प्रलंबित विकासाचे कामे तात्काळ होण्यासाठी महामहीम राज्यपाल महोदय यांच्याकडे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना चे वतीने मागणी करण्यात आलेली होती. या मागणीची महामहीम राज्यपाल सी, पी, राधाकृष्णन यांच्या सचिवालयाने दखल घेतली आहे तसे पत्र राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा कार्यालय यांनाही दिलेले आहे. व पत्रानुसार तसे निर्देश उपसचिव व मुख्य सचिव कार्यालय मंत्रालय मुंबई यांना देण्यात आले आहे याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली चे वतीने प्रदेश उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना दहाडे , कृष्णा भाऊ वाघाडे, भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ समरीत , गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर व अहेरी तालुका पदाधिकारी महेश अलोणे, सुरेश दुर्गे व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आभार मानले आहे ,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular