VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, १३ डिसेंबर २०२४::- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री,राज्यसभेचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब यांच्या आज ८४ व्या वाढदिवसानिमित्त अहेरी येथे विविध वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ८४ सत्कारमूर्ती तथा खेळात व अभ्यासात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस राज्य पातळीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) या होत्या तर उद्घटिका म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या नागपूर विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम भाभीजी, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी तालुका अध्यक्ष रमेशजी चुक्कावार,राष्ट्रवादी काँगेस चे नेते माझी जिल्हा परिषद सदस्य ऋषी दादा पोरतेट,राष्ट्रवादी काँगेस चे नेते जहीरभैया हकीम, प्रा.विठ्ठल निखुले श्रीनिवास विरगोनवार, अमोल मुक्कावार नगरसेवक , श्रीनिवास चठारे नगरसेवक , नामदेव पेंदाम, शैलेश गेडाम, महेश बाकीवार टाटाजी गेडाम , मधुकर चीलनकर, महेश कुमरम, रमेश कस्तुरवार,अफसर खान, सुमित मोतकुरवार, रहेमान शेख, शरीफ शेख, शोभाताई मडावी, गीताताई दुर्गे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,इयत्ता दहावीत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी,विभागीय खेळात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी,ज्येष्ठ व सेवानिवृत्त शिक्षक,सेवानिवृत्त बँक मॅनेजर आदींचा असा एकूण ८४ सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार संपूर्ण देशात पसरविणारे माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचे जीवन अनेकांना आदर्श असून अनेक अडचणींना सामोरे जाऊन सह्याद्री पर्वत सारखे ते उभे आहे असून आपले कार्य व आपली कदर झाली पाहिजे,आपल्याला आणखी चांगले कार्य करण्याची शक्ती मिळाली पाहिजे तसेच काही अडचण असल्यास मी सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार असे भावोद्गार भाग्यश्री ताई यांनी काढले. शाहीन हकीम भाभी म्हणाल्या की आदरणीय पवार साहेब वयाच्या ८४ वर्षी ही युवकांना लाजवेल अशी शक्ती घेऊन राजकारण करत आहे.त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहे.महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले असून शरदचंद्र पवार हे नाव ऐकताच नव्याने हिम्मत आणि जोश अंगात तयार होतो.सर्व सत्कार मूर्तीचे शाहीन भाभी हकीम यांनी अभिनंदन केले व सदैव महिलांच्या पाठीशी आहे असे सांगितले.ऋषी दादा पोरतेट,सुरेश भाऊ चुक्कावार, जहीर हकीम, आदींनी पण उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी केले तर आभार श्रीरामवार ताई यांनी मानले.
