Wednesday, August 5, 2026
HomeChamorshiडिस्नीलैंड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मिडीयम स्कूल चामोर्शी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

डिस्नीलैंड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मिडीयम स्कूल चामोर्शी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या अभिमानाने,उत्साहाने साजरी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०४ जानेवारी २०२५::- डिस्नीलैंड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मिडीयम स्कूल, चामोर्शी शाळेमध्ये १९४वी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्ताने वेशभूषा स्पर्धा, भाषण स्पर्धा , वादविवाद स्पर्धा व अंताक्षरी स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातील ज्ञान व बुद्धी प्रबळ होण्यास मदत होईल, अशा प्रकारे सर्वांगीण विकासावर आधारित कार्यक्रम पार पाडले. यामध्ये शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्राचार्य जे. विलास सर, उपप्राचार्य संपत सर यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन करून समाजातील स्त्री चे महत्वाचे स्थान याविषयी अधिक माहिती दिली. तसेच मंडल सर, रामटेके सर, गवारे मॅडम व भांडारकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना स्त्री – शक्ती, स्त्री – सक्षमीकरण याबाद्दल महत्त्वाची माहिती दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular