Wednesday, August 5, 2026
HomeGadchiroliअधिकाधिक महिलांनी भाजपा सदस्य बनून भाजपाची शक्ती वाढवावी, माजी आमदार डॉ....

अधिकाधिक महिलांनी भाजपा सदस्य बनून भाजपाची शक्ती वाढवावी, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली सर्किट हाऊस येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित बैठकीला केले मार्गदर्शन.

गडचिरोली, १० जानेवारी २०२५::- भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने नेहमीच महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक पावले उचलली असून महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहेत.भाजपा मातृशक्तीच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहिलेली आहे त्यामुळे अधिकाधिक महिलांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊन भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढवावी असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भाजपा सदस्य अभियाना संदर्भातील बैठकीला उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. या बैठकीला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश, जिल्हा , तालुका व शहर स्तरावरील महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular