Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiमाता मंदिर बांधकामना करिता केली आर्थिक मदत - पप्पीभाई पठाण शिवसेना तालुका...

माता मंदिर बांधकामना करिता केली आर्थिक मदत – पप्पीभाई पठाण शिवसेना तालुका प्रमुख…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०६ फेब्रुवारी २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेले लोकप्रिय मा.पप्पीभाई पठाण यांची ओळख जनसामान्यांना परिचीत आहे.याचे विशेष कारण म्हणजे,सर्वसामान्यांच्या अडचणींच्या वेळी आर्थिक मदत करणे,रूग्णांना रूग्णालयात नेण्यासाठी स्वतःची रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे,सामाजिक कार्यात नेहमी मदतीसाठी सहकार्य करित असतात,.काही दिवसापूर्वी मा. पप्पी पठाण यांनी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील एका अपरिचीत अत्यंत गरिब कुटुंबातील प्रमुख व्यक्ती रूग्णालयात भरती असतांना त्यांची हलाखीची परिस्थिती बघून त्यांना तब्बल १० हजार रूपये रोख देऊन मदत केली होती.

गडचिरोली जिल्ह्यातील,चामोर्शी तालुक्यातील, मौजा शंकरपुर हेटी येथील माता मंदीराचे पैशाअभावी अर्धवट राहिलेले बांधकाम काम पुर्ण करण्यासाठी मा.पप्पीभाई पठाण शिवसेना तालुका प्रमुख चामोर्शी यांनी स्वत: पुढाकार घेऊन,सिमेंट खरेदीसाठी आर्थिक मदत दिली तसेच “माता मंदिराचे” बांधकाम पुर्ण करून देण्याची ग्वाही शंकरपुर हेटी येथील नागरिकांना दिली.त्यामुळे शंकरपुर हेटी येथील नागरिकांनी, मा.पप्पीभाई पठाण शिवसेना तालुका प्रमुख चामोर्शी यांचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular