Monday, September 14, 2026
HomeGadchiroliखास बैलाच्या जंगी इनामी शंकरपटा निमित्त कुरुड येथे भव्य नाट्य महोत्सव –...

खास बैलाच्या जंगी इनामी शंकरपटा निमित्त कुरुड येथे भव्य नाट्य महोत्सव – मा.खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०७ फेब्रुवारी २०२५ ::- परंपरेला साजेसा आणि नाट्यप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा भव्य नाट्य महोत्सव मौजा कुरुड (ता. वडसा, जि. गडचिरोली) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. खास बैलांच्या जंगी इनामी शंकरपटा निमित्ताने आयोजित या महोत्सवात तीन दर्जेदार संगीत नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले.या नाट्य महोत्सवात खालील नाटकांचे आयोजन करण्यात आले.

–1. संगीत “पेटलेल्या चुली” – श्री दत्त प्रसादिक नाट्य समाज, झुरे मोहल्ला, कुरुड

2. संगीत “अंधारलेल्या वाटा” – श्री दत्त प्रसादिक नाट्य समाज, पारधी मोहल्ला, कुरुड3. संगीत “लाडका” – श्री नूतन शेतकरी नाट्य संपदा, कांबळी मोहल्ला, कुरुड

या भव्य नाट्य महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी “नाटक हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून, यामुळे सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडू शकते” असे मत व्यक्त केले. तसेच, प्रेक्षकांनी या नाटकांमधून बोध घेऊन समाज उन्नतीसाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.या तिन्ही नाट्य प्रयोगांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. समाजातील वास्तववादी समस्यांना स्पर्श करणाऱ्या या नाटकांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे सर, तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, ग्रामपंचायत सदस्य विलास पिलारे, प्रमोद झिलपे, विकास पायडलवार आदी उपस्थित होते.

तसेच, नाट्यरसिक आणि गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावली.या नाट्य प्रयोगांमध्ये सामाजिक वास्तव, गूढ रहस्य आणि हास्याचे उत्तम मिश्रण पाहायला मिळाले. प्रत्येक नाटकाने रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि मनःपूर्वक टाळ्यांचा कडकडाट मिळवला.कुरुडवासीयांनी पारंपरिक उत्साहाने या नाट्य परंपरेला पुढे नेल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular