Saturday, September 12, 2026
HomeAheriमहागाव येथील युवकांना काँग्रेस समन्वयक अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल - नेट दिली...

महागाव येथील युवकांना काँग्रेस समन्वयक अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल – नेट दिली भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, १६ फेब्रुवारी २०२५::- तालुक्यातील महागाव येथील युवकांना क्रीडा साहित्याची गरज होती.पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य युवकांनी घेऊ शकत नव्हते.आज येथील युवकांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक कंकडालवार यांनी त्या युवकांची अडचण लक्षात घेऊन युवकांना क्रीडा साहित्य खरेदी करून दिले.त्यामध्ये व्हॉलीबॉल,नेट आणि इतर काही वस्तू आहे.या साहित्यामुळे महागाव येथील क्रीडा युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यावेळी गावातील समस्त क्रीडा युवकांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.जिल्ह्यातील खेळाडू खेळामध्ये मागे नाहीत मात्र खेळ शिकण्यासाठी खेळाचे साहित्य आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे साहित्य नसल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग खेळामध्ये मागे आहेत.प्रत्येक युवकांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे.याहेतूने व्हाॅलीबाॅल किट भेट देण्यात आल्याचे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.यावेळी महागाव ग्रामपंचायतचे सदस्य वंदना दुर्गे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,कार्तिक तोगम,प्रमोद रामटेके,चंद्राजी रामटेके,भीमा पानेम,तुषार वेलादी,मल्लेश तलांडी,शाहिर वेलादी,अतुल दुर्गे,निखिल कोरेत,आकाश वेलादी,प्रकाश वेलादी,मनीष पानेम,अजय पानेमसह महागाव येथील युवक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular