Friday, May 22, 2026
HomeNagapurगडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला गती : मा.खा. अशोकजी नेते यांची बजाज इंडस्ट्रीज नागपूरला...

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला गती : मा.खा. अशोकजी नेते यांची बजाज इंडस्ट्रीज नागपूरला महत्त्वपूर्ण भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

नागपूर,०२ मार्च २०२५ ::- गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने घडावा आणि जिल्हा भविष्यकाळात उद्योग जिल्हा म्हणून ओळखला जावा, या दृष्टिकोनातून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांनी आज, दि. १ मार्च २०२५, नागपूर येथील एमआयडीसी हिंगणा परिसरातील बजाज इंडस्ट्रीज येथे भेट देऊन सखोल पाहणी केली.या भेटीत उद्योगाची कार्यप्रणाली, उत्पादन प्रक्रिया तसेच यंत्रसामग्रीची आधुनिकता याविषयी माहिती घेतली.

तसेच, इंडस्ट्रीचा डेमो चित्रफितीद्वारे पाहण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि सुरजागड व कोनसरी लोह प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याला औद्योगिक स्वरूप मिळावे, हा या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचे मा. अशोकजी नेते यांनी सांगितले.

याप्रसंगी नागपूर आयटी सेलचे प्रमुख रंजित आडे, आदिवासी आघाडी आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, तसेच बजाज इंडस्ट्रीजचे मालक श्री. शर्मा यांची उपस्थिती होती. औद्योगिक विकासाच्या दिशेने ही पाहणी महत्त्वाची भूमिका बजावणार असून, गडचिरोलीच्या औद्योगिक वाटचालीसाठी ती दिशादर्शक ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular