Saturday, May 23, 2026
HomeChamorshiवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू – माजी खासदार अशोकजी नेते यांनी कुटुंबीयांची सांत्वना...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू – माजी खासदार अशोकजी नेते यांनी कुटुंबीयांची सांत्वना भेट व आर्थिक मदत दिली…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी ,

गडचिरोली/ चामोर्शी, ०३ मार्च २०२५::- चामोर्शी तालुक्यातील गणपुर येथील शेतकरी स्व. संतोष भाऊजी राऊत (वय ३५ वर्षे) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे.

स्व. संतोष राऊत हे सायंकाळच्या सुमारास शेतात काम आटोपून घरी परतत असताना, वाघाने दडी मारून बसून अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका तीव्र होता की त्यांनी घटनास्थळीच प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजी खासदार अशोकजी नेते यांची सांत्वना भेट व आर्थिक मदत:

घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी तातडीने गणपुर येथे स्व. संतोष राऊत यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी होत सहानुभूतीपूर्वक संवाद साधला तसेच आर्थिक मदतही सुपूर्त केली.यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, तसेच गणपुर गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular