VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कोरची कुरखेडा परिसरातील शेतकऱ्यांचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना जनता तक्रार दरबारात निवेदन,
एमएसईबी इलेक्ट्रिक करिता डिमांड भरली असल्याने सौर वीज जोडणीस शेतकऱ्यांचा नकार,
नवीन जनसंपर्क कार्यालयातील पहिल्याच जनता तक्रार दरबाराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद.
गडचिरोली, ०३ मार्च २०२५::- ज्या ज्या शेतकऱ्यांनी एमएसईबीकडे कृषी पंप वीज जोडणी करिता डिमांड भरलेली आहे त्यांना सौर कृषी पंप योजनेमध्ये सहभागी न करता एम एस सी बी च्या जुन्या पद्धतीप्रमाणे मीटरची जोडणी करून द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशासनांकडे केली आहे.गडचिरोली येथील नवीन जनसंपर्क कार्यालयामध्ये झालेल्या जनता तक्रार दरबारात कोरची, कुरखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी आपणाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करित निवेदन दिले.
2019 पासून शेतकऱ्यांनी कृषी पंप विज जोडणी करिता डिमांड भरणा केलेला आहे परंतु त्यांना अजूनही वीज जोडणी करून दिली नाही उलट जोडणी करून न देता अपारंपारिक सौर कृषी पंप जोडणी करण्याबाबतचे नोटीस दिलेले आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला असून यापुढे डिमांड भरणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ द्यावा मात्र आम्हाला जुन्याच पद्धतीने वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी वजा विनंती केली आहे. या संदर्भात त्यांनी गडचिरोली येथे माझी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची जनता तक्रार दरबारात भेट देऊन आपले निवेदन दिले व न्याय मिळवून देण्याची विनंती केली.**यावेळी , सुखराम कुमरा कसोडा ,सुभाष करमकर भीमपूर, ,गोपाल मडावी भरीटोला, दिलवर जाम भाकरकुडा , देवराव कुमोटी अंतरगाव, योगेश कुमरे गोटा टोला, भगवान सिंग नेते साने सुमित्रा मडावी सोलापूर अभिजीत निंबेकर कोरची, विलास अलार्म कोरची , राजू कुमोटी अंतरगाव, गोटा टोला, पुरुषोत्तम पधंरे, गोविंद साहेब कुंजाम जयराम मेली राजू कुमोटी अंतरगाव, महेंद्र कुमरे गोटा टोला, बेलसाय गुहोटी मुवेरी यांचे सह स्थानीक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर देवरावजी होळी यांनी तात्काळ वीज वितरण चे अधीक्षक अभियंता यांच्याशी फोनवरून बोलणी करून यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची सूचना केली.
