Saturday, May 23, 2026
HomeChamorshiमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तथा महिला संस्कार कलश संस्था चामोर्शीच्या विद्यमाने ...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तथा महिला संस्कार कलश संस्था चामोर्शीच्या विद्यमाने जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,/ चामोर्शी, १३ मार्च २०२५::- ९ मार्च रोजी नगरपंचायत सांस्कृतिक भवन मध्ये हा कार्यक्रम पार पडला**कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सहमहिला आघाडी प्रमुख नागपूर विभाग मृणाल तुमपल्लीवार , तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या महिला संस्कार कलश संस्थेच्या अध्यक्षा आरती भिमनवार , प्रमुख वक्त्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर देवरी मॅडम उपस्थित होते

, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणी पुठ्ठेवार पीएसआय पोलीस विभाग चामोर्शी, ज्योती जीचकार मॅडम शिक्षक परिषदेच्या तालुका महिला आघाडी प्रमुख, वर्षा भिवापुरे नगरसेविका नगरपंचायत चामोर्शी उपस्थित होत्या.

डॉ. देवरि यांनी स्त्रियांच्या आरोग्य व काळजी यावर मार्गदर्शन केले. पीएसआय कल्याणी पुठ्ठेवार यांनी महिला सुरक्षा व सायबर गुन्हा यावर प्रकाश टाकला.

आरती भिमनवार यांनी महिलांचे सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले, तसेच वर्षा भिवापूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले, मृणाल तुमपल्लीवार यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन भारती तीतरे यांनी केल तसेच यावेळी ऐतिहासिक महिलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रथम क्रमांक पाकेवार मॅडम यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक अवीता बंडावर यांनी घेतला .

तसेच यावेळी संस्कार कलश संस्थेच्या सदस्या शितल बुर्लावार , वर्षा येरावार रजनी मस्के यांनी महिलांसाठी खेळ घेतले, त्यामध्ये सपना गट्टूवार व भारती तीतरे यांचा नंबर पटकावला. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव नम्रता मार्तीवार यांनी केलं . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीक्षा सुरावार,सपना उपग्णलावार , समीक्षा बंडावार, प्रीती कागदेलवार यांनी सहकार्य केले

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular