VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/सिरोंचा, ०९ एप्रिल २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली यागावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक माती कोसळल्याने दोन शेतकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली.यात उप्पाला रवी व कोंडा समय्या दोघे राहणार जानमपल्ली दुर्दैवी मृत्यू झाला असून तिसरा मजूर संतोष कोनम हा सुखरूप असल्याची माहिती आहे.
सदर घटनेची माहिती होताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सूचनेवरून सिनेट सदस्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी तात्काळ जानमपली गावात जाऊन मृतकांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली. व त्यांना आर्थिक मदत दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर किलोरी, नगरसेवक सतीश भोगे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सलाम शेख, मदनया मादेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, उपस्थित होते.
