Saturday, September 12, 2026
HomeChamorshiराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दिला सर्वे करण्याचा आदेश - डॉ.प्रणय खुणे...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दिला सर्वे करण्याचा आदेश – डॉ.प्रणय खुणे यांच्या यशस्वी पाठपुराला यश…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

चामोशी तालुक्यातील मौजा माडे आमगाव ते विकासपल्ली बहुप्रलंबित रस्ता मंजुरी चे यशस्वी पाठपुराव्यानंतर संबंधित अभियंता यांना घेऊन सर्वे करिता निघाले राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ,प्रणय भाऊ खुणे,

गडचिरोली/चामोर्शी, १३ एप्रिल २०२५::- विकासपल्ली चामोशी तालुक्यातील मौजा माडेआमगाव विकासपल्ली व विकासपल्ली ते गरंजी हा रस्ता गेल्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून राखडलेला आहे परंतु या रस्त्याचे काम मंजूर झाले नाही व नागरिकांनी या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनास व लोकप्रतिनिधी यांना आजपर्यंत शेकडो अनेक अर्ज विनंती केल्या परंतु हा रस्ता मंजूर झाला नाही.

शेवटी नागरिकांनी या रस्त्याच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांना निवेदन दिले होते याची दखल घेऊन डॉ, खुणे यांनी मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला व याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अभियंता यांना दिलेल्या पत्रानवे सदर रस्त्याचे सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले या निर्देशांणवे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता गंपावर साहेब यांना घेऊन विकासपल्ली येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत सदर रस्त्यांचा सर्वे सबंधित अभियंता यांनी केला.

यावेळी विकासपल्ली व माडेआमगाव येथील गावकऱ्यांनी सदर रस्ता झालाच पाहिजे अशी भूमिका घेतली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांनी माडे आमगाव आणि विकासपल्ली येथे घेतलेल्या नागरिकांच्या बैठकीत सदर रस्ता पूर्ण झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असे सांगितले.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, सरपंच शामल सिकदार, माजी सरपंच बीरेन विश्वास, सुमेन विश्वास,उपसरपंच मिहीर विश्वास,परितोष मंडल, वासुदेव सिकदर, माजी सरपंच रामदास मडावी, सुकठ रॉय व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular