Thursday, July 30, 2026
HomeGadchiroli"फक्त तुझ्यासाठी...!" — स्व. अमोल भोयर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तकाचे भावनिक...

“फक्त तुझ्यासाठी…!” — स्व. अमोल भोयर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तकाचे भावनिक प्रकाशन – मा.खा.डॉ. अशोकजी नेते…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,३० एप्रिल २०२५::- “आता सहवास जरी नसला, तरी तुमच्या स्मृतींचा सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर” — या शब्दांत स्व. अमोल भोयर यांच्या आठवणींना अमरत्व देणारे “फक्त तुझ्यासाठी…!” हे पुस्तक नूतन अमोल भोयर यांनी लिहिले असून, या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा विशेष म्हणजे लग्नाचा वाढदिवसाचे औचित्य साधून हे पुस्तक प्रकाशित मोठया भावनिक वातावरणात पार पडला.

गडचिरोली येथील गांडली सभागृह, आरमोरी रोड येथे नुकताच आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्याला उद्घाटक म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,तर प्रमुख पाहुणे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार साहेब,डॉ.सचिन हेमके,सपाटे सर जी,भोयर परिवार व मोठया संख्येने मित्रपरिवार उपस्थित होते.स्व. अमोल भोयर यांच्या जीवनातील शेवटचे दहा महिने पंधरा दिवसाचा खडतर प्रवास, त्यात असलेल्या वेदना, आशा-निराशेच्या छटा आणि त्या आठवणींचा भावनिक ठेवा लेखिका नूतन अमोल भोयर यांनी “फक्त तुझ्यासाठी…!”

या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध केला आहे. हे पुस्तक म्हणजे पतीच्या स्मृतीप्रती पत्नीचे शब्दांतून वाहिलेलं मौन अश्रूंचं श्राद्ध आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.खा.डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “जन्म आहे, तर मृत्यू आहे. पण आठवणी कधीच मरत नाहीत. अमोल एक शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते.

त्याने अल्पवयातच आपल्यातून एक पोकळी निर्माण केली आहे. त्यांच्या आठवणींना फक्त तुझ्यासाठी हा पुस्तक अर्पण करताना मी भोयर कुटुंबाच्या दुःखात सहभागी होतो आणि ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना करतो.”अध्यक्षीय मनोगतात भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे म्हणाले, “हा कार्यक्रम भावनिक असून, पप्पू म्हणजेच स्व.अमोल भोयर हा प्रत्येकाच्या दुःखात धावून जाणारा, सर्वांचा लाडका होता. त्याच्या जाण्याचं दुःख शब्दात सांगता येणं अशक्य आहे.असे डोळ्यातुन अश्रू व भावनावश होत नूतन यांनी त्या आठवणी अक्षररूपात जपल्या, ही एक मोठी अभिव्यक्ती आहे. ‘फक्त तुझ्यासाठी…!’ हे पुस्तक म्हणजे एका नात्याचं, आठवणींचं आणि संघर्षाचं प्रगल्भ चित्रण या पुस्तकात मांडला.”

यासाठी मि नुतनचे अभिनंदन व धन्यवाद देतोय.व भोयर परिवाराच्या दुःखात सामील होऊन श्रद्धांजली अर्पण करतोय.या कार्यक्रमात स्व.अमोलच्या आठवणीचे चित्रफीत दाखवत पाहण्यात आले तेव्हा स्वरूप अत्यंत भावनिक झाल. मंचावर उपस्थित मान्यवरांपासून ते स्नेही-मित्र परिवारापर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. स्व. अमोल यांच्या आठवणी इतक्या जिव्हाळ्याच्या होत्या की सभागृहात एकही डोळा कोरडा राहिला नाही.या भावनिक प्रकाशन सोहळ्याला भोयर कुटुंबीयांसह मित्रपरिवार, स्नेही आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. अमोल यांच्या आठवणींनी भारावलेल्या या कार्यक्रमात अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.या कार्यक्रमाचे संचालन समिर भोयर तर आभार मयुर मुंनघाटे यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular