Friday, May 22, 2026
HomeAheriआमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी खोंडे परिवाराची घेतली सांत्वनपर भेट...

आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी खोंडे परिवाराची घेतली सांत्वनपर भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मेहनती व्यक्तिमत्व हरविल्याचे भावोद्गगार काढले,स्व.विजय खोंडे यांना श्रद्धांजली अर्पण केले

गडचिरोली/अहेरी, २३ मे २०२५::- येथील माजी प्राचार्य डॉ. विजय खोंडे यांचे 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी खोंडे परिवाराची नागपूर येथील अंबाझरी हिल टॉप एरियातील निवासस्थानी गुरुवार 22 मे रोजी सांत्वनपर भेट घेतले. यावेळी आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रथमतः माजी प्राचार्य स्व.डॉ.विजय खोंडे यांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिले.

तसेच माजी प्राचार्य स्व.डॉ.विजय खोंडे हे शैक्षणिक क्षेत्रात चिकित्सक, मेहनती , प्रामाणिक, विश्वासू होते. सोबतच अतूट नाते व जिव्हाळ्याचे सबंध जोपासले. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे भावोद्गगार आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी काढून खोंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी प्राचार्य स्व डॉ. विजय खोंडे यांच्या अर्धांगिनी जयश्री खोंडे, भाऊ सेवा निवृत्त अभियंता संजय खोंडे, सेवा निवृत्त नायब तहसीलदार संध्या खोंडे, व्याही रमन मोहितकर, प्रेमाताई मोहितकर, दीपाली खोंडे, वीरंज उकीनकर आदी सदस्य उपस्थित होते. भेटीच्या वेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत साहेबराव देशमुख, राजेश पुरी, भूषण तल्हार होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular