VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र/मुंबई, १४ जुलै २०२५::- भाजपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांची आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात विशेष भेट घेण्यात आली. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या भेटीच्या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,भाजपाचे जेष्ठ नेते धनंजय पडीशाल्लवार तसेच पक्षातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. . प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाचा प्रदेश संघटन अधिक सक्षम आणि जनतेशी जोडलेला होईल, असा विश्वास मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.”राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि शेवटी स्वतः” या भाजपा धोरणाचा पुनः एकदा प्रत्यय या संवादातून आला. सदर भेटीद्वारे संघटनात्मक एकतेचा आणि वरिष्ठ नेत्यांचा सन्मान जपणारा भाजपाची परंपरा आहे हे भेटीदरम्यान अधोरेखित झाले.
