Sunday, May 24, 2026
HomeKurakhedaग्रामसभेच्या अधिकाराचा हणण खपवून घेणार नाही - डॉ, प्रणय भाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष...

ग्रामसभेच्या अधिकाराचा हणण खपवून घेणार नाही – डॉ, प्रणय भाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील जप्त केलेले ट्रॅक्टर तालुका प्रशासनाने सोडावे,

राज्य शासनाने ग्रामसभेला न्याय न दिल्यास गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामसभेचा विराट जन आंदोलन उभारणार,डॉ, प्रणय भाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,

गडचिरोली/कुरखेडा, १५ जुलै २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ग्रामसभा घाटी अंतर्गत गौण खनिज रेती उपसा करण्याची परवानगी ग्रामसभेने संबंधित घाटी येथील घरकुल धारकांना घरकुल करिता रेती नेण्यासाठी परवानगी दिली होती व ती सदर रेतीची उपसा करून संबंधित गोरगरीब घरकुल धारक ट्रकटर द्वारे कार्यस्थळावर नेत असताना महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर गावातील ट्रॅक्टर जप्त केली व संबंधित ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने दंड ठोठावला त्यामुळे येथील ग्रामसभेने नाराजी व्यक्त केली व या विषयावर घाटी येथे भव्य आमरण उपोषण आंदोलन सुरू केला व आंदोलनाला आज नऊवा दिवस होता यावेळी आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

व सदर विषयावर गावकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली आणि संबंधित गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभेच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही व या विषयावर गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामसभाना एकत्रित करून राज्यपालाची आपण भेट घेणार व जोपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांना त्यांचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असे प्रतिपादन डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी केले, उपोषणकर्ते यांनी खालील मागण्या केल्या,जप्त केलेल्या ट्रॅक्टर तात्काळ सोडण्यात यावे,ग्रामसभेच्या पूर्वपरवानगीशिवाय शासकीय अधिकाऱ्यांनी गौण खनिज किंवा वनसंपत्तीचा वापरावर कारवाई करू नये, याबाबत लेखी आश्वासन देण्यात यावे अशी मागणी केली तसेच मंडळ अधिकारी किरंगे यांनी ग्रामसभेचे अधिकाराचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, आदि मागणी उपोषणकर्त्यांनी प्रामुख्याने केले यावेळी नितेश कवाडकर, फालगून फुले, उपसरपंच, ग्रा, घाटी, त्रंबक नाकाडे, फाल्गुण मेश्राम, प्रकाश ठाकूर, दीपक भोयर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular