Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध; हरकती...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध; हरकती व सूचना २१ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १७ जुलै २०२५::- ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांनी दिनांक १२ जून २०२५ रोजी निर्गमित आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग व १०२ पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.ही प्रारूप प्रभाग रचना दिनांक १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप रचनेवर कोणीही हरकत अथवा सूचना असल्यास संबंधित नागरिकांनी त्यांची समर्पक कारणासह लेखी हरकत / सूचना जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावी. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उप जिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular