VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,१६ जुलै २०२५::- गडचिरोलीपॅरामाउंट ऍचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत अतिदुर्गम भागात साडे सातशे किलोमीटरच्या वर रस्ते निर्माण केले व विविध ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्त्याद्वारे कनेक्टिव्हिटी निर्माण केले त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तसेच जिल्ह्यतील अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी, गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अतिदुर्गम भागात प्रत्यक्ष भेटी देऊन गोरगरीब आदिवासी सोबत संवाद साधले व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, सदर कार्य करीत असताना अनेक वाहनांची तसेच मशीनरींची आजपर्यंत जाळपोळ सुद्धा झाली परंतु न खचता त्यांनी शून्यातून आपले कार्य अविरत सुरू ठेवले व त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा उलाढाल असलेला खुणे कन्स्ट्रक्शन अँड कंपनी तसेच एल, एल, डोंगरवार अँड कन्स्ट्रक्शन कंपनी उत्कृष्ट रित्या सुरु ठेवले त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे.

तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे व त्यांना महाराष्ट्र राज्यातून पॅरामाउंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सन्मानित करण्यात आला आहे याबद्दल त्यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, मुख्य सल्लागार देवानंद भाऊ खुणे,राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर,विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ समरीत, गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, युवा मानवाधिकार संघटना अध्यक्ष पारस भाऊ खुणे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, नागेश मडावी, यांनी केली आहे,तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा गडचिरोलीचे वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन,करण्यात आले.
