Friday, May 22, 2026
HomeMumbaiसुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र चपराळा येथील जमिनीला "क वर्ग"चा दर्जा द्या,, आमदार डॉ...

सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र चपराळा येथील जमिनीला “क वर्ग”चा दर्जा द्या,, आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वनमंत्री व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा,

महाराष्ट्र/ मुंबई, १७ जुलै २०२५::- सुप्रसिद्ध चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम (देवस्थान) तीर्थक्षेत्राला क वर्ग चा दर्जा देण्याची मागणी आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बुधवार 16 जुलै रोजी सकारात्मक चर्चा करण्यात आले.

दरवर्षी महाशिवरात्रीला चपराळा येथे मोठी जत्रा भरत असते. तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश व अन्य राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दररोज येथे दर्शनासाठी येत असतात. परंतु तीर्थक्षेत्राची जागा संस्थेच्या अधिनिस्त नसल्यामुळे देखभाल, दुरुस्ती व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी अडथळा आहे व विकास कामांना खिळ बसले आहे म्हणून तीर्थक्षेत्राचा जागा क वर्गात समाविष्ट करून विकासकामांचे मार्ग मोकळे होण्यासाठी आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे पाठवपुरावा केले.

बुधवार रोजी राज्याचे वन मंत्री ना.गणेश नाईक यांच्या दालनात महत्वपूर्ण व सकारात्मक बैठक पार पडली. लवकरच विषय मार्गी लागून चपराळा येथील देवस्थान व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकासकामांना चालना मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular