Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiलाइन्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कोनसरीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

लाइन्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कोनसरीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एलएमईएल प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, २२ जुलै २०२५::- गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २२) कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे.या कार्यक्रमात ५ एमटीपीए लोहखनिज ग्राइंडिंग प्लांट, १० एमटीपीए स्लरी पाइपलाइन, ४ एमटीपीए पॅलेट प्रकल्प यांचे उद्घाटन होईल, तर ४.५ एमटीपीए एकात्मिक पोलाद प्रकल्प, १०० खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा, सोमनपल्ली कर्मचारी वसाहत यांचे भूमिपूजन होणार आहे.कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे, एलएमईएलचे बी. प्रभाकरन, प्रशासनातील अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे; पद्मश्री तुलसी मुंडा आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. गडचिरोलीच्या औद्योगिक विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत, एलएमईएलने सरजागड लोहखनिज खाणी आणिराहताल. गडाचरालाच्या आद्यागिक विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत, एलएमईएलने सुरजागड लोहखनिज खाणी आणि कोनसरी येथील डीआरआय तथा पेलेट प्रकल्प कार्यान्वयीत केल्यापासून स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्तरंजित हिंसेचा मार्ग सोडून शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनाही कंपनीने उद्योग-केंद्रित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे.

त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रक्रियेला मदत करण्यासाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले आहे. शिवाय या औद्योगिक क्रांतीने गडचिरोलीच्या विकासाला अभूतपूर्व चालना दिली आहे. श्री. बी. प्रभाकरन यांच्या मते, २२ जुलै २०२५ हा दिवस गडचिरोली तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विदर्भाच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी झाल्यामुळे गडचिरोलीला देशाचे स्टील हब बनवण्याचे ऐतिहासिक स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले जात आहे. १४० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी गडचिरोली हे भारतीय स्टील उद्योगाचे जन्मस्थान होऊ शकले असते. ती वेळ आज आली आहे. आता खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या उदयाची वेळ आली आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला येथील औद्योगिक क्रांतीचा ध्वजवाहक असल्याचा अभिमान आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular