VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी येथील महाडायलिसिस केंद्रात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची सदिच्छा भेट,
गडचिरोली /चामोर्शी, ०५ ऑगस्ट २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका येथे महाडायलीसिस केंद्राचे सुरुवात गेल्या एक वर्षांपासून सुरु आहे,अनेक रुग्ण जे किडनीचे व्याधीने ग्रस्त आहेत त्यांना आपल्या किडनीच्या व्याधी निराकरणासाठी आधी जिल्ह्यात जाऊन आपला डायलीसिस करावा लागत होता जिल्ह्यात एकच डायलीसिस केंद्र असल्यामुळे रुग्णांची फार मोठी फरफट होत होती परंतु आता राज्य सरकारने तालुका स्तरावर सदर महाडायलिसिस केंद्राची सुरवात केली आहे या महाडायलिसिस केंद्रात मोफत डायलीसिस करण्यात येते.

व रक्त वाढीचे इंजेक्शन देण्यात येत आहेत व सदर केंद्र सर्व सुविधा युक्त आहे या महाडायलिसिस केंद्रात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा सचिव प्रकाश भाऊ थुल यांनी सदिच्छा भेट दिली.

व या केंद्राची सविस्तर माहिती जाणून घेतले या केंद्राचे प्रभारी राहुल रामटेके यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली या केंद्रात दररोज दहा पंधरा रुग्ण येत आहेत तसेच 43 रुग्ण नियमित आहेत व नागरिकांनी या मोफत महाडायलिसिस केंद्राचा लाभ घ्यावा असे राष्ट्रीय आवाहन मानवाधिकार संघटनेच्या वतीने कळविण्यात आलेले आहे,
