VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्याकडे घेतली धाव,
पाट दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून कन्नमवार जलाशयाचे पाणी त्वरित सोडा भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे जलसंपदा प्रशासनाला दिले निर्देश.
गडचिरोली/ चामोर्शी, ०५ ऑगस्ट २०२५::- पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे खोळंबली त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून कन्नमवार जलाशयाचा पाणीसाठा 90 टक्के भरला असतानाही ते पाणी सोडले नसल्याने शेतकऱ्यासमोर संकट उभे ठाकले आहे. चामोर्शी,लक्ष्मणपुर, कुरुड, भेंडाळा, हळदवाही, सोनापुर, आमगाव या मायनर चे शेतकऱ्यांनी रेगडी जलाशयातील पाणी सोडण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्याकडे धाव घेत मागणीचे निवेदन दिले.
यावेळी माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी जलसंपदा विभागाच्या प्रशासनाशी सवांद साधत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता लवकरात लवकर पाणी सोडण्यासाबंधी निर्देश दिले व पाट दुरुस्तीचे काम वेळेत न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पाणी सोडण्याची कार्यवाही लवकरच करणार असल्याचे जलसंपदा प्रशासनाने आश्वस्त केले.
यावेळी दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, छत्रपती दुर्गे, अजय पुडो, पुरुषोत्तम बावणे, अंशुल दासरवार, तुषार सातपुते, अनिल प्रिसिंगलवार उपस्थित होते.
