Saturday, May 23, 2026
HomeChamorshiपीएमश्री नूतन शाळा परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा. शाळा समिती व...

पीएमश्री नूतन शाळा परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा. शाळा समिती व शाळेतील शिक्षकांची चामोर्शी पोलीस निरीक्षकाकडे तक्रार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०६ ऑगस्ट २०२५::- शहरातील वाडवंटी चौक येते असलेली पीएमश्री. नूतन शाळा परिसरात ४ ते ५ अवैध दारू विक्रेते पानटपरी परिसरात बसून खुलेआम व मोठ्या प्रमाणात दारू विक्री करीत असतात. याचाच परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेतील शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आज शाळेतील शिक्षक व शाळा समिती यांनी पोलिस स्टेशन चामोर्शी येथे जाऊन पोलिस निरीक्षक कालबांदे यांना निवेदना द्वारे तक्रार देण्यात आले.

निवेदनात म्हटले होते की पीएमश्री नूतन शाळेच्या परिसरात खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असते आणि दारू पिणारे हे पानटपरी परिसरात दारू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोटारसायकल उभी करून ठेवली जाते. त्या मुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आना जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच महत्त्वाची बाब रात्रीच्या सुमारास काही युवक हे रोज शाळेच्या गेट वर चळून शाळेमध्ये प्रवेश करतात व त्या ठिकाणी दारू प्राशन करून तिथे दारूच्या रिकाम्या बाटला सुद्धा इतरत्व फेकून ठेवतात.जसे की शाळा नसून बियर बार चा परिसर आहे. त्या मुळे शाळेतील शिक्षकांना शाळेत आल्याबरोबर रोज दारूच्या रिकामी बाटला, डिस्कोचर ग्लास, खाली वेफर्स पॅकेट, पाण्याच्या खाली बाटला फेकावे लागते. असे पोलिस निरीक्षक कालबांदे यांना निवेदना द्वारे सांगितले आहे.

सदर निवेदनाची दखल घेऊन मी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार.

पोलिस निरीक्षक कालबांदे साहेब, पोलीस स्टेशन चामोर्शी

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular