Saturday, June 13, 2026
HomeGadchiroliवैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामाला तात्काळ मंजूरी द्या ,, भाजप प्रदेश उपाध्यक्ष...

वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामाला तात्काळ मंजूरी द्या ,, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १३ ऑगस्ट २०२५::- नवनिर्मित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय गडचिरोली या संस्थेची जागा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्र गडचिरोली १५ हे. आर, (३७,०६ एकर) जागा परत करण्याची प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देऊन नविन वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी या मागणीचे निवेदन माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिले.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गडचिरोली ला सुपरपेशालीस्ट हॉस्पीटलला मान्यता मिळाली होती. परंतु मी त्यावेळी आमदार होतो आणि १७ वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केला होता, म्हणुन सुपरपेशालीस्ट हॉस्पीटलला व मेडीकल कॉलेजचे फायदे मला माहीत होते. म्हणुन महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळी त्यांना घेराव, चक्काजाम, आंदोलन १ महीना केला होता. पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटले कि डॉ. तु आंदोलन केला म्हणून महाराष्ट्रातील पहीला मेडीकल कॉलेज गडचिरोली घोषणा केलेले होते.

म्हणुन गडचिरोली येथील मेडीकल कॉलेज च हॉस्पीटला जागा कमी पडणार आहे आणि वनविभागाची जागा मिळण्यासाठी खुप वेळ लागणार आहे. म्हणुन नवनिर्मित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय गडचिरोली या संस्थेच्या नावाने जागा झालेली आहे. तिच जागा कायम ठेवून नविन वैद्याकिय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामास तात्काळ मंजूरी देण्याबाबत चे निवेदन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांना रीतसर निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचे सूचना केली. याप्रसंगी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular