VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
पाच दिवसांत चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा शिवसेनेचा ईशारा,
गडचिरोली/अहेरी, ०२ सप्टेंबर २०२५::- आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करुन ग्रामसेवक विरोधात गंभीर आरोप करत त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) तर्फे करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना अहेरी विधानसभा क्षेत्राचे ज्येष्ठ नेते विलास पोद्यमपल्लीवार तसेच माजी सरपंच अजु पठाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन हा मुद्दा उचलला आहे. निवेदनात म्हटले आहे की, तेंदूपत्ता हंगाम २०२५ मध्ये लिलाव प्रक्रिया निद्यमबाह्य रिलीने पार पहली.

कोणतीही प्रामसभा न घेता, तसेच योग्य जाहिरात प्रसिद्ध न कता नोटगीकृत नाकारून इतरांना कंत्राट देण्यात आले. यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरीतून वंचित राहावे लागते आहे. या प्रकरनाची सखोल चौकशी करून ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, हर घर नल से जल या योजनेअंतर्गत आलापल्ली येथे पाणीपुरवठा बंद असल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकूनही ग्रामसेवकाने त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले. हा प्रकार गंभीर असून याची तपासणी करून जबाबदारांवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात अली आहे.
सन २०२३-२७आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षात पेसा समितीला शासनाकडून प्राप्त झालेला निधी किती आणि त्यातील विकासकामासाठी किती खर्च करण्यात आला, याचा तपशील देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोजमाप पुस्तिकेची साक्षांकित प्रत देण्याचेही निवेदनात नमूद केली आहे. आलापल्लीचे ग्रामसेवक मुख्यालयात प्रत्यक्ष किती दिवस उपस्थित राहतात, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर सर्व चौकशी पाच दिवसांत न सल्यास शिवसेना शिंदे गट व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रामपंचायत सदस्य विलास पोचमपल्लीवार, माजी सरपंच अजू पठाण यांनी दिला आहे.
