Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliमा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे विविध ठिकाणच्या गणपती बाप्पा व ज्येष्ठा गौरी...

मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे विविध ठिकाणच्या गणपती बाप्पा व ज्येष्ठा गौरी (महालक्ष्मी) दर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०१ सप्टेंबर २०२५:जी::- माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. श्री. अशोकजी नेते यांनी गणेशोत्सव व जेष्ठा गौरी( महालक्ष्मी) च्या निमित्ताने गडचिरोली व चामोर्शी येथील विविध ठिकाणी जाऊन गणपती बाप्पा तसेच ज्येष्ठा गौरी (महालक्ष्मी) यांचे मनोभावे पूजन-अर्चन करून दर्शन घेतले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिकतेने भरलेल्या या भक्तीमय वातावरणात मा.खा. डॉ. नेते यांनी गणपती बाप्पा व महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली व समाजाच्या सुख-समृद्धीची मंगलकामना व्यक्त केली.

“गडचिरोली येथील दर्शन प्रसंगी”

भाजपाचे जेष्ठ नेते गजाननजी येंगदलवार,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर,भाजपा नेते संजयजी बारापात्रे,*चामोर्शी येथे*सामाजिक कार्यकर्ते गोपाल नेनेवार,चामोर्शी पोलिस स्टेशन येथे गणपती बाप्पा चे दर्शन घेतले.यावेळी पोलिस स्टेशनच्या वतीने थानेदार अमुल कादबाने यांनी मा.खा. डॉ. नेते यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले.

“ज्येष्ठा गौरी (महालक्ष्मी) पूजन व दर्शन”

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी गडचिरोली, सामाजिक नेते संजयजी पंदिलवार आष्टी,सामाजिक नेते प्रफुल कोत्तावार चामोर्शी,माजी न्यायाधीश सुनिलजी दिक्षित, चामोर्शी — यांच्या घरी तब्बल २०९ वर्षांची परंपरा जपत आजही महालक्ष्मी स्थापना करण्यात आली.

मा.खा. डॉ. नेते यांनी मनोभावे पूजन व दर्शन घेतले.भाजपा जिल्हा महामंत्री सौ. गिताताई हिंगे गडचिरोली, सामाजिक नेते प्रशांतजी भूग्गुवार गडचिरोली यावेळी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, थानेदार अमुल कादबाने, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, सोपान नैताम, नरेश अल्लसावार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या या पूजन-दर्शन उपक्रमामुळे गणेशोत्सव व महालक्ष्मीच्या सणासुदीला अधिक अध्यात्मिक व प्रेरणादायी वातावरण लाभले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular