Saturday, September 12, 2026
HomeAheriआरोग्यदायी अहेरीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल...

आरोग्यदायी अहेरीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना,

गडचिरोली/अहेरी,१८ जुलै २०२६::- अहेरी तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आमदार तथा राज्यमंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

समितीच्या स्थापनेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व अन्य आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत. आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे, आवश्यक औषधांचा पुरवठा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ, स्वच्छता, जनजागृती आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी समिती सातत्याने काम करणार आहे.

यावेळी आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले की, “प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून अहेरी तालुका आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”

‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’च्या स्थापनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर अधिक प्रभावी देखरेख राहणार असून नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही, आरोग्य सेवेतील अडचणी दूर करणे आणि सेवेची गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा, हीच आमची बांधिलकी!” या ध्येयवाक्याला अनुसरून अहेरी तालुक्यात आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular