Sunday, September 13, 2026
HomeAheriगणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात हजारो गणेशभक्तांचा उपस्तितीत अहेरीचा राजाचे झाले शाही थाटात...

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशभक्तांचा उपस्तितीत अहेरीचा राजाचे झाले शाही थाटात विसर्जन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती,

गडचिरोली/अहेरी, ०८ सप्टेंबर २०२५::- अहेरी इस्टेटचा मानाचा गणेश म्हणजे “अहेरीचा राजा” दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्सवाने दहा दिवस विविध कार्यक्रमाने मनोभावे रोज महाआरतीत भक्तिभावाने साजरा करण्यात आले.अहेरीचा राजा गणेशाचे आयोजित शाही विसर्जन सोहळ्यात अहेरी इस्टेटचे राजे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी तथा पूजन करीत मानाचा गणरायांचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा गणेशउत्सव अहेरी राजनगरीत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. प्रसिद्ध बाभूळगाव ढोल-ताशांच्या गजरात, नागपूरचा डीजे तसेच परपरागत‌ बाजे सहीत हजारो गणेशभक्तांचा उपस्तितीत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अहेरी राजनगरीतीचा मुख्य मार्गाने फिरून रात्री उशिरा वांगेपल्ली प्राणहीता नदीघाटावर “अहेरीचा राजाला” निरोप देण्यात आला त्यावेळी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

याप्रसंगी राजे अंब्रीशराव आत्राम म्हणाले की, अहेरीत दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा झाला. लोकांनी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला. विसर्जनावेळी मनात थोडी खंत आणि दु:ख असते, पण त्याचवेळी बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येणार या आनंदाने प्रत्येकाचे मन भारावून जाते.

अहेरी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुक शिस्तीत व शांततेत पार पडला. या यशस्वी व्यवस्थेबद्दल राजे अंब्रीशराव आत्राम यांनी म्हणाले की, पोलीस विभाग, नगरपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेली सहकार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.अहेरीचा राजा विसर्जन सोहळ्याला शहरातील विविध सामाजिक, राजकीय, संघटनांचा तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उपस्थिती होती. पोलीस आणि राज परिवाराचा एकत्रितपणे केलेल्या व्यवस्थेमुळे हा विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडला.

यावेळी राज परिवारातील राजमाता राणी रुख्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, संतोषजी मेश्राम ( भाऊजी), प्रविणराव बाबा, वैभव श्यामकुंवर यांचा सह हजारोचा संख्येने गणेश भक्तांची संपूर्ण विसर्जन सोहळ्यात उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular