Wednesday, July 29, 2026
HomeEtapalliएटापल्लीतील ८ गावांमध्ये ५ महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित परिसरातील नागरिक त्रस्त...

एटापल्लीतील ८ गावांमध्ये ५ महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित परिसरातील नागरिक त्रस्त…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

त्रस्त ग्रामस्थांची महावितरण व तहसील कार्यालयावर धडक,

गडचिरोली/एटापल्ली, २२ सप्टेंबर २०२५::- एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील पिपली बुर्गी, बेलमागड, गणपहाडी, हेटळकसा, मोहुर्ली, कुद्री आणि नागुलवाडी पा अतिदुर्गम गावांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलास कोरेत यांच्या नेतृत्वात महावितरण आणि तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले,

निवेदनात म्हटले आहे की नियमित वीजपुरवठा सुरू करावा, जुनाट वीज खांब व तारा दुरुस्त करावे, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा आणि नवीन विद्युत सहायक नियुक्त करावा, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमित असून, महिन्यातून एखाद्याच दिवशी वीज येते.

तरी महावितरणकडून संपूर्ण महावितरणचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांना निवेदन देताना ग्रामस्थ महिन्याचे वीजबिल आकारले जात आहे. यामुळे जनतेला मोठा आर्थिक फटका बसत असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वीज नसल्यामुळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून, रुग्णांना उपचारात मोठ्या अडचणी येत आहेत. गरोदर महिला, लहान मुले आणि सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मोठी समस्या निर्माण झाली आहे.

तसेच पावसाळ्यात लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघाताचा धोका वाढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले,गेल्या पाच महिन्यांपासून तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही महावितरणने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. संतप्त नागरिकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता जि. ह. वाघमारे, कनिष्ठ अभियंता अरुण मडावी, तांत्रिक अभियंता दिनेश थेरे आणि एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या कार्यालयात भेट दिली आणि समस्या निवेदनमार्फत मांडल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular