Saturday, May 23, 2026
HomeChandrapur३०,००० हजार रुपयांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी ACB च्या जाड्यात...

३०,००० हजार रुपयांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी ACB च्या जाड्यात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

लाचखोर महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना अटक,

चंद्रपुर, २९ सप्टेंबर २०२५::- जिल्हा पुर्नवसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी ३०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज दि. २८/०९/२०२५ रोजी कार्यवाही केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारवार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगांव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे गेलेली असल्याने सदर मालमत्तेवर तकारदार यांचे मुलीचे नांव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणुन नामनिर्देशीत केले होते.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्या. मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी ही प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून ‘कनिष्ठ अभियंता’ या पदाकरीता निवड झालेली होती.तक्रारदार यांचे मुलीचे प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून निवड झालेली असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्णपडताळणी करण्याकरीता जुलै / २०२५ मध्ये जिल्हा पुर्नवसन कार्यालय चंद्रपूर येथे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या मुलीसह प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील जिल्हा पुर्नवसन कार्यालय येथील आलोसे राहा. महसुल अधिकारी श्री. नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना भेटले असता तक्रारदार यांना त्यांच्या यांना आलोसे सहायक महसुल अधिकारी श्री. नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन आज दिनांक २८/०९/२०२५ रोजी तक्रार दिली.तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून आज दि. २८/०९/२०२५ रोजी आलोसे आलोसे सहायक महसुल अधिकारी श्री. नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी स्वतः करीता ३०,०००/-रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.

त्यावरून आज दि. २८/०३/२०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे सहायक महसुल अधिकारी श्री. नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन) कार्यालय चंद्रपूर येथील कार्यालयात ३०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील तपासकार्य सुरू आहे.सदरची कार्यवाही श्री. सागर कवडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पो. हवा. हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहूरपवार, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular