VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, २९ सप्टेंबर २०२५::- चामोर्शी तालुक्यातील निसर्गरम्य देवस्थान मुतनुर ज्या ठिकाणी आदिवासी समाजाचे राजाराणी देवस्थान आहे व या ठिकाणी खालच्या भागात खुणे कंट्रक्शन कंपनी व एल, एल डोंगरवार कन्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचे परिवार गुरनोली यांचे आराध्य दैवत “आदिशक्ती दुर्गामाता मंदिर “आहे.

या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी नवरात्रीला संपूर्ण मुतणुर व परिसरातील हजारो नागरिकांकरिता भव्य महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम असतो यावर्षी सुद्धा सदर महाप्रसाद वितरण कार्यक्रम

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोज मंगळवारी दुपारी बारा वाजता पासून ते आपले आगमनापर्यंत पहांदि पारी कुपार लिंगो देवस्थान मुतनूर येथे महाप्रसाद वितरणाचे आयोजन केले आहे तरी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त भाविक भक्त यांनी या दिव्य महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन महाप्रसाद ग्रहण करावे.

असे आवाहन खुणे कंट्रक्शन कंपनीचे प्रमुख डॉ, प्रणय भाऊ खुणे व संचालक राकेश भाऊ डोंगरवार व लोकेश भाऊ डोंगरवार , व राहुल भाऊ झोडे व संपूर्ण खुणे परिवार गुरनोली ता, कुरखेडा जिल्हा गडचिरोली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांचे वतीने करण्यात आले आहे.

