VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १०ऑक्टोबर २०२५::- संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणारी ‘विश्वमांगल्य सदाचार सभा’ नियोजन बैठक गडचिरोली येथील कर्तव्य कक्ष, चामोर्शी रोड येथे उत्साहात पार पडली.बैठकीस प्रमुख मार्गदर्शक सौ. सविता ताई पुराम (विदर्भ संयोजिका व माजी जिल्हा परिषद सभापती) यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून समाजातील सदाचार, सेवा आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या बैठकीत प्रमुखउपस्थिती म्हणून सौं योगिताताई प्रमोद पिपरे, माजी नागराध्य, जिल्हा अध्यक्ष भजपा महिला आघाडी जिल्हा गडचिरोली,सौ. योगिता ताई भाडेकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा), सौ. वैशाली ताई नरोटे, सौ. गीताताई हिंगे (जिल्हा महामंत्री), सौ. अमिता मडावी (माजी पंचायत सभापती), सौ. रोशनी ताई वरघनटे (तालुका अध्यक्षा), सौ. वर्षा ताई शेडमाके (जिल्हा सचिव) आणि सौ. प्रतिभा ताई चौधरी (कोषाध्यक्षा) हे उपस्थिती होते. सभेत सामाजिक सौहार्द, स्त्रीशक्ती आणि संस्कारमूल्यांच्या जपणुकीवर विचारमंथन झाले. सदाचार आणि सेवाभावाच्या माध्यमातून समाजातील एकता व प्रगतीचा संदेश देणारी ही सभा गडचिरोलीच्या सामाजिक जीवनात नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरली.
