VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,१० ऑक्टोबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या येडानूर येथे धरती आभा अंतर्गत शिवार फेरी घेऊन आणि ग्रामपंचायत मारोडा येथे धरती आभा कृती आराखडा सभा ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्ट जनजागृती अभियान राबविण्यात आले.तसेच येडानूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून शिवार फेरी सुद्धा काढण्यात आली.तसेच मारोडा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जनजागृती उत्कृष्ट अभियान गावकरी आराखडा सभा सुद्धा तयार करण्यात आला. धरती आबा शिवारफेरी मध्ये संबंधित विभागाचे कर्मचारी पोलीस पाटील. गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

जनजागृती शिवार फेरी आराखडा तयार करण्यासाठी येडानूर ग्रामपंचायतीचे सरपंच – रजनीबाई पांडुरंग उसेंडी, उपसरपंच – सुनील पवार, ग्राम विकास अधिकारी टी.डी.हरडे, सदस्य – संतोष पदा, सदस्य – दामिनी कांदो, सदस्य – सुरेखा राठोड, तंटा मुक्त समिती येडानूर – बालाजी पाठवी आणि ग्रामपंचायत मारोडा येथे सुधा धरती आभा कृती आराखडा सभा घेण्याकरिता उपस्थितीत मारोडा ग्रामपंचायतचे सरपंच – अनिल नामदेव जुरे, उपसरपंच – नंदा पुरषोत्तम बोरकुटे, सदस्य – शेषराव जुवारे,कृषी सेवक – धोटे मॅडम तसेच गावकरी बांधव सुधा मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सदर कार्यक्रम राबवण्यासाठी विस्तार अधिकारी, जमले साहेब,पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांनी सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
