Saturday, June 6, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न...

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मतदार यादीतील विविध त्रूट्यांवर नोंदविणार आक्षेप,

गडचिरोली, १३ ऑक्टोबर २०२५::- भारतीय राज्यघटनेने मतदानाचा सर्वांना समान अधिकार दिलेला आहे मात्र वर्तमानातील हुकूमशाही भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करून व निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून निवडणुका जिंकत आहे याचा उलगडा लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते माननीय राहुलजी गांधी यांनी काही दिवसापूर्वी केले.

त्यानंतर काँग्रेस पक्षाने विविध स्तरावर केलेल्या चौकशीत सुद्धा अनेक डुप्लिकेट मतदारांसाह इतर त्रुट्या आढळून आले आहेत,  गडचिरोली जिल्ह्यातील मतदार यादी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत जिल्ह्यात अनेक मतदार यादी मध्ये झालेली दुबार नोंदणी, हयात असलेल्या मतदारांचे यादीतून गहाळ झालेले नाव यासारख्या अनेक त्रूट्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्या अनुषंगाने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी विविध मतदार आहेत त्यांची तपासणी करून त्यांच्या अनुषंगाने जिल्हाभरात आक्षेप नोंदविणार आहेत.यावेळी बैठकीत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जि. प.उपाध्यक्ष मनोर पाटील पोरेटी, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत, आरमोरी  तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, नंदू वाईलकर, वामनराव सावसाकडे, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, सुरेश भांडेकर,

अब्दुल पंजवानी, रजनीकांत मोटघरे, दत्तात्र्य खरवडे, उत्तम ठाकरे, विनोद लेनगुरे, संजय चन्ने, भूपेश कोलते, राकेश रत्नावार, प्रेमानंद गोंगले, सुभाष धाईत, श्रीनिवास ताडपल्लीवार, राजेश ठाकूर, अनिल कोठारे, महादेव भोयर, प्रशांत सोमकूवर, सचिन गावतुरे, विलास चिचघरे, अविनाश श्रीरामवार,  जितेंद्र मुनघाटे, विनायक चिचघरे, राजेंद्र आखाडे, संजय मेश्राम, सुधीर टेम्भूर्णे, परमेश्वर गावडे, चंद्रशेखर मडावी, उमेश आखाडे, नागोराव उईके, पुरुषोत्तम सिडाम, रमेश मानकर, गोरख उंदीरवाडे, चुळाराम कोलते, आशुतोष भरणे, योगेश चापले, आकाश बगडे, अनिल भांडेकर, अजय भांडेकर, दिनेश सिडाम, मिलिंद बारसागडे, हेमंत कोवासे, संतोष पीपरे सौ. अशाताई मेश्राम, सौ. अपर्णाताई खेवले, सौ. कल्पनाताई नंदेश्वर, सौ. रिताताई गोवर्धन, सौ. कविताताई उराडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular