VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मॉडेलिंग, मेकअप, फॅशन शो, मेहंदी व अवॉर्ड फंक्शनच्या रंगतदार स्पर्धांमध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग — कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अभिनेत्री माधुरी पवार,
गडचिरोली::- २४ ऑक्टोबर २०२५::- जेटीएम स्टार इव्हेंट सीजन 2 या भव्य कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मॉडेलिंग, मेकअप, फॅशन शो, अवॉर्ड फंक्शन, मेहंदी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपा चे जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, ऍड. विजय चाटे, हेमलता वाघाडे, प्रेमीला अलोणे,सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध कलाकार माधुरी पवार ह्या होत्या.
त्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमादरम्यान स्पर्धकांना मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी आपल्या भाषणात “आपली संस्कृती, परंपरा आणि देशातील विविधता” या विषयांवर प्रभावीपणे प्रकाश टाकला. तसेच गडचिरोली जिल्ह्यात असे इव्हेंट होत राहिले तर गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशाच्या कानकोपऱ्यात पोहचण्यात महत्वाचे योगदान राहील, त्यांनी युवा पिढीने आधुनिकते सोबत आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा असे आवाहन केले.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित स्पर्धक व नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून आयोजकांचे अभिनंदन केले.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तरुण-तरुणींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक ज्योती उंदीरवाडे व मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
