Wednesday, September 16, 2026
HomeGadchiroliगडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता सागर निंबोरकर...

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता सागर निंबोरकर यांना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे आशिर्वाद…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १८ नोव्हेंबर २०२५ ::- गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्रनिता सागर निंबोरकर यांनी काल नामांकन दाखल केले. त्यानंतर मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांनी त्यांना आशिर्वाद देत आगामी निवडणुकीत भक्कम विजयासाठी शुभेच्छा देत, तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी सागर निंबोरकर, डॉ. भारत खटी व संजय बारापात्रे उपस्थित होते. निंबोरकर यांच्या उमेदवारीमुळे गडचिरोली शहरात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular