Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमुरखडा/नवेगाव येथील कचऱ्याचे डंपिंग यार्ड/घनकचरा विलगीकरण हटविण्या करिता उद्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय...

मुरखडा/नवेगाव येथील कचऱ्याचे डंपिंग यार्ड/घनकचरा विलगीकरण हटविण्या करिता उद्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व नागरिक यांचा मोर्चा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मुरखळा नवेगाव वार्ड क्रमांक 3 येथील कचऱ्याचे डंपिंग यार्ड / घनकचरा साठवणूक केंद्र विलगीकरण शेड हटवून नागरी,वस्ती पासून लांब अंतरावर स्थानांतर करणेबाबत व त्या ठिकाणी कोणतेही कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम व कचरा डम्प न करण्याबत व तलावाचे सौदंर्यीकरण करणे या विषयावर दिनांक 24/12/2025 रोज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प. येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असो व नवेगाव मुरखळा येथील नागरिक महिला यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

गडचिरोली, २३ डिसेंबर २०२५::- गडचिरोली येथील मौजा नवेगाव मुरखळा वार्ड क्रमांक तीन येथील राहत्या वस्तीला लागून सर्वे क्रमांक 48 मध्ये नवेगाव (मूरखळा) ग्रामपंचायत यांनी सन 2022 – 2023 मध्ये कचऱ्याच्या (डंपिंग यार्ड) घनकचरा विलगीकरण शेड ची उभारणी केलेली असून सदर डंपिंग यार्ड च्या अवतीभोवती N.A.T.P.चे प्लाट पडलेले असून इतरही Commercial Plot पडलेले आहे.

आणि जवळूनच 30 मीटर रुंदीचे रिंग रोड गेलेले असून जे चंद्रपूर ते नागपूर हायवेला जोडण्यास रोड शासन प्रस्थावित आहे.बाजूला लागुनच सार्वजनिक पोलीस ग्राउंड आहे.

या ठिकाणी दररोज सकाळ-सायंकाळ पोलीस भरतीची तयारी करणारे मुल-मुली, जेष्ठ नागरिक त्या डंपिंग यार्ड ला लागून असलेल्या ग्राउंडवर व्यायाम, मार्निंग वॉक, योगा करण्यासाठी येत असतात.

तसेच सदर डंपिंग यार्ड च्या अवतीभोवती सर्वे नंबर 44, 46, 47/1, 49, 50, 51 याप्रमाणे N.A.T.P.चे ले आउट पडून त्या जागेवर लोकांनी घरांचे बांधकाम करून वास्तव्य करिता आहेत.

आणि नियोजित सर्वे क्रमांक 51/2 प्लाट क्रमांक 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12 यासारखे अनेक प्लाट निवासी प्रयोजनाच्या हेतूने ग्रामपंचायतीने दिनांक 28/05/2012 रोजी जावक क्रमांक 383 / 2012 अन्वये अकृषक परवानगी निवासी प्रयोजनार्थ प्लाट पाडण्यास N.O.C. दिलेली आहे.

 मा. जिल्हा आरोग्य अधिकारी,जी.प.गडचिरोली यांनी सुद्धा त्यांचे पत्र क्रमांक आरोग्य /साथरोग/ नादेय 3924 / 2012 दिनांक 07/08/2012 नुसार नाहरकत प्रमाणपत्र दिलेले असून ती जागा लोकांच्या निवासी प्रयोजनाकरिता वापरण्यास हरकत नाही. हे अटी शर्थीच्या अधीन राहून नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहेत. असे एकूण त्या संदर्भाच्या अनुषंगाने विविध 07 विभागांनी N.O.C. (नाहरकत प्रमाणपत्र) दिलेल्या आहेत.

सर्व प्रकारचे कचऱ्याचे डंपिंग यार्ड हे राहत्या वस्तीपासून लांब असतात. या सर्व बाबी नवेगाव ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांना माहिती असून सुद्धा शासनाची दिशाभूल करून सर्वे क्रमांक 48 वर घनकचरा विलगीकरण शेड प्लास्टिक कचर्याचे डंपिंग यार्ड / वेस्टेज मटेरियल साठवणूक केंद्राची उभारणी केलेली आहे.

हि बाब नवेगाव वार्ड क्रमांक 3 मधील लक्षात आल्यानंतर सदर अधिकारी व पदाधिकारी यांना वारंवार लेखी तोंडी माहिती दिलेली होती. व डंपिंग यार्ड ची जागा बदलवण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक 24/12/2025 रोज बुधवारी नवेगाव वार्ड क्रमांक 3 येथील समस्त नागरिक क महिला पुरुष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने सदर विषयावर न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येत आहे.

तरी या आयोजित मोर्चास गडचिरोली शहरातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय मानव अधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular