VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत आविका नवनियुक्त संचालक व आविका पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर,
गडचिरोली, २४ डिसेंबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यात सन-२०२५-२६ खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रे सुरळीत चालवण्या संदर्भात येणाऱ्या अडचणी त्वरित दूर करून टीडीसी मार्फत चालवण्यात येणारे खरेदी केंद्र प्रस्ताव दिलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना मंजुरी देण्यात यावी या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांचे नेतृत्वात आदिवासी विकास महामंडळाचे नवनियुक्त संचालक तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मान.अविशयांत पांडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले.

यावेळी अविका पदाधिकारी संघटनेचे चांगदेव फाये व्यंकटी नागीलवार आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनूजी गोटा संचालक गोपालजी उईके संचालक यशवंतजी चौरीकर व आविका संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व धान उत्पादक जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती आहे. मात्र यावर्षी प्रशासनाने धान खरेदी केंद्रे उशिरा सुरू केल्याने अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीस अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेत खरेदी न झाल्यामुळे धान ओलसर होणे, किड लागणे तसेच वजन घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

याशिवाय काही ठिकाणी खरेदी केंद्र मंजूर करण्यासंदर्भात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने प्रस्ताव सादर केले परंतु प्रस्तावित खरेदी केंद्र मंजुरी न देता आदिवासी विकास महामंडळाने ने स्वतःचे केंद्र मंजूर केल्याने व काही ठिकाणी दुसऱ्या केंद्रांना सेंटर जोडण्याचे पत्रनिर्गमित केले असल्याने शेतकऱ्यांना दूरवर जावे लागणार धान्य विक्रीसाठी जावे लागणार असून वाहतूक खर्च वाढणार आहे. त्यामूळे काही भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसणार असून तातडीने उत्तम काम करणाऱ्या व प्रस्ताव सादर केलेल्या अविका संस्थांना खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी द्यावी असे माजी खासदार नेते व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यांनी स्पष्टपणे मांडले.
मा.खा.डॉ. अशोकजी नेते उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की,
सर्व खरेदी केंद्रे तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावीत,आवश्यक त्या ठिकाणी नवीन खरेदी केंद्र अविकासंस्थेमार्फत मंजूर करावीत,शेतकऱ्यांची धान खरेदी विनाविलंब करण्यात यावी,
आदिवासी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी. तसेच विकास संस्थेच्या आवारात पडलेले धनाचे त्वरित उचल त्वरित करण्यात यावी अशी मागणी केली.यावेळी जिल्हाधिकारी अविशयांत पांडा यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले
यावेळी अविका पदाधिकारी संघटनेचे चांगदेव फाये, व्यंकटी नागीलवार आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनु गोटा, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोपाल उईके, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक यशवंत चौरीकर अविकासंस्थेचे पदाधिकारी लोमेश कोठांगले मडकाम जी विविध अविका सहकारी संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
