VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/घोट,२९ जुलै २०२६::- गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता घोट येथील साई मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टी घोट-आष्टी मंडळ तसेच घोट-सुभाषग्राम व हळदवाही- रेगडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे यांनी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून ज्येष्ठांचा सन्मान करण्याचे आणि कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन केले आहे.
