VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चंद्रपूर ,११ जानेवारी २०२६::- येथील MEL प्रभाग क्र. ३ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी संजय नगर व कृष्ण नगर परिसरात जाहीर प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन मतदारांना केले.
यावेळी MEL प्रभागातील भाजपाचे उमेदवार जितेश कुळमेथे, आशा देशमुख, नितेश गवळी आणि सविता सरकार या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आव्हान डॉ. होळी यांनी उपस्थित नागरिकांना केले. भाजपच्या नेतृत्वाखाली झालेली विकासकामे, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली.
चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता भाजपकडेच का असावी, याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. भाजपाने कायम विकासाला प्राधान्य दिले असून, भविष्यातही शहराचा विकास वेगाने करण्यासाठी भाजपाच सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला आर्णी विधानसभा चे आमदार राजू तोडसाम, दिनकर सोमलकर, मंडळ प्रभारी सविता दंडारे, जिल्हा महामंत्री भाजप शरद तिवारी, जितेंद्र सिंह, रवींद्र सिंह यांचे सह शहरातील वर प्रभागातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचार सभेमुळे MEL प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
