VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शीत ‘संगीत–टाकलेलं पोर’, नाटकाचा भव्य प्रयोग उत्साहात संपन्न,
गडचिरोली/चामोर्शी २०२६::- येथील जय बजरंग नाट्यकला मंडळ,संताजी नगर यांच्या सौजन्याने व चंद्रकमल थिएटर्स,सिंदेवाही/वडसा प्रस्तुत संगीत–’टाकलेलं पोर’ या सामाजिक, लावणी प्रधान नाटकाचा भव्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती लाभली.

नाट्य प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राजे साहेब म्हणाले,नाटक हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून त्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करता येते,असे मत त्यांनी व्यक्त केले.
समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे कार्य सुद्धा नाटकातून प्रभावीपणे घडते,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास माजी खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ.मिलिंद नरोटे,युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणयजी खुणे तसेच या नाट्य प्रयोगाचे आयोजक नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,नगर पंचायत सभापती सौ.सोनालीताई पिपरे उपस्थित होते.
